अमरावती : शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या प्रहार
संघटनेकडून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ११ एप्रिल रोजी
आमदारांच्या घरांसमोर मशाली पेटवून आंदोलन करणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले
आहे.
दरम्यान मंगळवारी (दि. १) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते
राजू शेट्टी यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली आहे. राज्यभर शेतकर्यांच्या विषयाला
घेऊन लवकरच आंदोलन केले जाणार असून त्यासंदर्भात आज प्रहार प्रमुख बच्चू कडू यांची
भेट घेतली, अशी माहिती शेट्टी
यांनी दिली. अनेक सरकारे आली आणि गेली मात्र आम्ही तरीही शेतकऱ्यांच्या बाजूने
लढतो आहोत. पुढेही आमची लढाई कायम राहणार असून बच्चू कडू देखील आमच्यापैकीच एक आहे, असेही ते म्हणाले.
0 Comments