कोल्हापूर : फॉरेक्स
शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा १० ते १५ टक्क्यांपेक्षा जादा परतावा
देण्याच्या आमिषाने फुलेवाडी, जिवबा नाना जाधव पार्कसह उपनगरातील गुंतवणूकदारांची
एक कोटी रुपयांपेक्षा जादा रकमेची फसवणूक केल्याची तक्रार करवीर पोलिसांत दाखल
करण्यात आली आहे. याप्रकरणी सागर माने स्नेहल माने जिवबा नाना जाधव पार्कमधील सागर
मारुती माने (३३) व स्नेहल सागर माने (३१, सादगी बंगला, कारदगे हिल्स, कोल्हापूर) या दाम्पत्याला
पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, या
तक्रारीनंतर फसगत झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. फसवणूक
झाल्याचे निदर्शनास येताच अनेक वयोवृद्ध गुंतवणूकदारांसह महिलांनी करवीर
पोलिस ठाण्यासमोर मंगळवारी सकाळी आक्रोश केला. याप्रकरणी फसगत झालेल्यांनी कागदपत्रांसह करवीर पोलिस ठाण्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी केले आहे,
सुनील मनोहर आंबेकर (५४, रा.महालक्ष्मी पार्क, रिंगरोड फुलेवाडी,कोल्हापूर) यांनी संशयितांविरुद्ध फिर्याद दिली आहे. महाराष्ट्र ठेवीदार ग्राहक संरक्षण (एमपीआयडी) कायद्यांतर्गत संशयित सागर माने व स्नेहल मानेविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
0 Comments