कोल्हापूर : कोल्हापूर
जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित केशवराव गयावळ चषक १९ वर्षांखालील आंतरतालुका
टी-२० क्रिकेट स्पर्धेत पन्हाळा तालुका संघाने विजयी सलामीसह आघाडी मिळविली.
पीरवाडी (ता.
करवीर), जिवबा नाना जाधव पार्क परिसरात भाऊराव पाटील क्रिकेट
मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन उद्घाटन 'केडीसीए'चे अध्यक्ष व
माजी खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते आणि 'केडीसीए'चे माजी अध्यक्ष आर. ए.
तथा बाळ पाटणकर व ऋतुराज इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हवेत तिरंगी फुगे सोडून
झाले. यावेळी सौ. कल्याणी गयावळ, केदार गयावळ, सुनील काणकेकर, डॉ. वल्लभ घोटगे, केतन गयावळ, सौरभ काणकेकर, स्मिता काणकेकर, श्रुती घोटगे, वैदेही गयावळ, सई काणकेकर यांची
प्रमुख उपस्थिती होती.
प्रथम फलदांजी
करताना करवीर तालुका असोसिएशनने १७.३ षटकांत सर्वबाद ८८ धावा केल्या. यात तेजस
जगताप १६, अनिकेत जाधव १४ धावा केल्या. पन्हाळा तालुका संघाच्या तेजस
रोकडेने ३ विकेटस् घेतल्या. उत्तरादाखल पन्हाळा तालुका असोसिएशनने ६ बाद ८९
धावांसह विजय साजरा केला. तेजस रोकडेने १५, ओम महाडिकने १३ व
पृथ्वीराज राजगंणेने नाबाद १३ धावा केल्या. करवीर संघाकडून वीरधर पवारने ३, तनिष्क पोलावरने
२ विकेटस् घेतल्या.
0 Comments