कोल्हापूर : मुलींना
दर्जेदार उच्च शिक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारने मोफत शिक्षण देण्याची
घोषणा केली. त्याची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, सरकारकडून
महाविद्यालयांना दिली जाणारी प्रतिपूर्ती रक्कमच मिळाली ॥ नसल्याने सांगत काही महाविद्यालयांनी
मुलींना शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावला आहे. सरकारच आम्हाला पैसे देत नाही, तर आम्ही
तुम्हाला कसे मोफत शिक्षण द्यायचे, असा सवाल या को महाविद्यालयांकडून केला जात
आहे.
मुलींना मोफत
शिक्षण देण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
त्यानुसार उच्च शिक्षणमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या
विद्यार्थिनींना मोफत शिक्षण दिले जाते. राज्य सरकारने मोफत शिक्षण योजना सुरू
केल्यानंतर काही महाविद्यालयांनी मुलींकडून शैक्षणिक शुल्क मागण्याचा प्रयत्न केला
असता अशा महाविद्यालयांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री
चंद्रकांत पाटील यांनी दिल्या होत्या. असे शैक्षणिक शुल्क कोण मागत असेल तर थेट
उच्च व तंत्रशिक्षण विभागीय सहसंचालकांकडे तक्रार करण्याचे आवाहन केले होते.
कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा देऊनही काही महाविद्यालये खुलेआम शुल्क मागत आहेत.
शिक्षण विभागाकडून कारवाई केली जात नसल्याची भावना पालकांमधून नियुक्ती केली जात
आहे. त्याची प्रतिपूर्ती रक्कम सरकारकडून महाविद्यालयाला दिली जात आहे. मात्र, कोल्हापूर शहरासह
जिल्ह्यातील काही महाविद्यालयांनी मुलींना शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावला जात
आहे.
ही योजना सुरू
झाल्यानंतर पहिल्या वर्षी या महाविद्यालयांनी पात्रताधारक मुलींना एकही रुपया
शुल्क घेतले नाही. मात्र, दुसऱ्या वर्षी सरकारकडून पैसेच मिळाले नसल्याचे
सांगत पैसे भरण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे विद्यार्थिनींसह पालक चिंतेत आहेत.
0 Comments