उजळाईवाडी : खासदार
छत्रपती शाहू महाराज १ यांच्या संकल्पनेतून विमानतळ टर्मिनल बिल्डिंग ते कोल्हापूर
मोफत बससेवा सुरू करण्यात आली. याची सुरुवात विमानतळ संचालक अनिल शिंदे व विमानतळ
सल्लागार कमिटी सदस्य तेज घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी करण्यात आली. नवीन टर्मिनल बिल्डिंग लोकार्पण सोहळा गेल्या
वर्षी २९ मार्च रोजी झाला होता.
एअरपोर्ट अथॉरिटी
ऑफ इंडिया चा तिसावा वर्धापन सोहळा होता. याच दिवशी विमानतळासाठी खासदार शाहू
महाराज यांनी विमानतळ ते कोल्हापूर बससेवा मोफत सुरू करून प्रवाशांची होणारी अडचण
दूर करण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन
विमानतळ संचालक अनिल शिंदे यांनी केले. या मोफत सेवेमुळे अंबाबाई दर्शनासाठी
येणाऱ्या प्रवाशांना तसेच कोल्हापूर शहरात येणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय होणार
आहे.
0 Comments